कीटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी

फवारणी करतांना  घ्यावयाची काळजी

 • कीटकनाशक  वापरण्यापूर्वी  लेबल माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे
 •           डब्यावरील  लाल  रंगाचे पतंगीच्या  आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके  सर्वात विषारी त्यानंतर पिवळा ,निळा हिरवा असा क्रम लागतो. हि चिन्हे सोपी सर्वसाधारण ,निरक्षर व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात. म्हणजेच हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत कमी विषारी असतात.
 •            तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये.
 •            फवारणी करतांना संरक्षक कपडे ,बुट ,हातमोजे ,नाकावरील मास्क इत्यादीचा वापर करावा.

 बाधित  व्यक्तीची घ्यावयाची काळजी.

 •            कीटकनाशक पोटात गेल्यास किंवा त्वचा ,डोके,श्वसनेंद्रिया  द्वारे विषबाधा होऊ शकते.
 •             व्यक्तीस विषबाधा  झाल्यास झाल्यास अपघात स्थानापासून दूर न्यावे. त्याच्या अंगावरील कपडे सैल करून बदलावे.
 •            रोग्याचे अंग /बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे. कोरड्या टॉवेलने पुसावे.
 •             कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास रोग्याला ताबडतोब ओकारी करण्याची उपाय योजना करावी.
 •             रोग्याला पिण्यासाठी बिडी / सिगारेट तंबाखू देऊ नये.
 •            रोग्याला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे कपडे सैल करावे.
 •             रोग्याला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून ध्यावे.
 •            रोग्याचा श्वासोच्छ्वास योग्य रीतीने सुरु आहे का ते तपासावे.
 •       रोग्याचा श्वासोच्छ्वास अनियमित किंवा बंद  झाल्यास त्वरित रोग्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरु करावा.
 •           रोग्याला झटके येत असल्यास त्याच्या दातांमध्ये मऊ  कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.
 •        रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणावयाचे प्रयत्न करू नये.
 •          बेशुद्ध रोग्याला काहीहि खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये.
 •         रोग्याला त्वरित कीटकनाशकाच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांकडे  घेऊन जावे. डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करावे.
 •       रोगी बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

अधिक माहिती करीता कृषी विद्यापीठातील तज्ञ् तसेच वैद्यकीय अधिकारी / डॉक्टर यांचेशी संपर्क साधावा.