FAQs

माती परीक्षण

माती परीक्षण का करावे? :-आपल्या जमिनीत किती अन्नद्रव्य उपलब्ध  आहेत हे माहिती होते. जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य आवश्यक असलेल्या अन्नद्रव्याची माहिती झाल्यामुळे संतुलित अन्नद्रव्य पुरवठा रासायनिक तसेच सेंद्रिय खते यांमधून करता येतो. यामुळे पिकांचे उत्पादन भरघोष येते जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते.

मातीचा नमुना कसा घ्यावा? :- २. एकर  मधून एक  मातीचा नमुना घ्यावा , त्यामध्ये   ते १०  खड्डे नागमोडी वळणाने करावे. धान ,गहू साठी  पंधरा सेंमी  पर्यन्त खोल खड्डा करावा , भाजीपाला पिकांसाठी ,कड धान्य पिकांसाठी ३० सेंमी  पर्यन्त खोल खड्डा करावा फळझाडासाठी १०० सेंमी  पर्यन्त खोल खड्डा करून नमुना घ्यावा . खड्डा इंग्रजी  ‘ V ‘ आकाराचा घ्यावा आणि माती लाकडी परत ने काढावी.

मातीचा नमुना कुठून घेऊ नये? :- गुरांच्या गोठ्याजवळ ,झाडाच्या खालची ,विहिरीजवळची माती परीक्षणासाठी घेऊ नये.

मातीचा नमुना केंव्हा घ्यावा? :जमीन नांगरणी आधी मोकळ्या जमिनीतून घ्यावा . रासायनिक खते  दिल्यानंतर महिन्यांनी घ्यावा ,पीक शेतात उभे  असतानी नमुना काढू नये.

शेतात माती ओली असतांनी मातीचा नमुना घ्यावा का? :- होय , शेतातील ओली माती काढून सावलीत वाळवावी बारीक करून प्रयोगशाळेत पाठवावे.