शास्त्रीय पध्दतीने मातीचा नमुना गोळा करणे

मातीचा नमुना गोळा करताना घ्यावयाची काळजी :

१) एक हेक्टर मधून एक नमुना मातीचा रंग आणि प्रकारानुसार घ्यावा.

२) पिकांची कापणीनंतर एक महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा.

३) विहिरी जवळचा नमुना घेऊ नये .

४) गुरांच्या गोठ्याजवळ किंवा गुरांचे मल-मूत्र ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणाहून नमुना घेऊ नये.

५) नमुना घ्यावयाच्या जागेवरचा काडी कचरा ,शेण ,गोवऱ्या असतील तर बाजूला काढावा.

६) रासायनिक खत टाकल्यानंतर अडीच महिन्यानंतर नमुना घ्यावा.

७) शेतांच्या आकारानुसार नागमोडी वळणाने मातीचा नमुना ८ ते १० ठिकाणाहून गोळा करावा.

८) स्क्रू अगर फावडा ,स्वच्छ रंगविरहित पिशवी (पॉलीथीन/कापडी ) वापरावे.

९) गंजलेले अवजारे वापरू नये.

१०) V आकाराचा खड्डा तयार करून वरच्या थरापासून ते खालीपर्यंत माती येईल याप्रमाणे काढावी.

११) नमुना काढल्यानंतर सावलीत वाळवावा.

१२) वाळवल्यानंतर माती बारीक करून पोळीचे आकाराचे पसरून चार भाग करावे त्यामधून विरुद्ध दिशेचे दोन भाग काढून टाकावे,पुन्हा अशी प्रक्रिया करून अर्धा किलो माती तपासणीसाठी पाठवावी.