- शेतातील कामापूर्वी आणि कामे झाल्यानंतर पिके,फळे ,भाज्या तसेच अंडी आणि मासे या कामात गुंतलेल्या सर्व शेतकरी तसेच कामगार या सर्वानी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे उपाय करणे आवश्यक आहे.
- शेतमाल कापणी किंवा तोडणीचे काम करत असतांना एका कामगाराला ४ ते ५ फुटाचा पट्टा वाटून दिल्यास काम पण योग्य होईल आणि योग्य सामाजिक अंतरही ठेवले जाईल.
- शेतकऱ्यांनी आराम करण्याच्या वेळेस , जेवण करताना तसेच मालाची ने-आण करताना शेतमाल भरताना व उतरवताना किमान एकमेकांपासून ३ ते ४ फुटाचे अंतर राखणे आवश्यक आहे.
- शक्यतो एकाच ठिकाणी गर्दी न करता शेतीमधील वेगवेगळी कामे कमीत कमी मजुरांमार्फत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शक्यतो घरातील माणसाच्या मार्फतच शेतीकाम करावीत ज्यामुळे बाहेरील विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
- शेतीकामे शक्यतो मशीनच्या साहाय्याने करावीत , त्यामध्ये कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा.तसेच शेती कामासाठी वापरली जाणारी अवजारे , गोणी तसेच पॅकिंगच्या गोष्टी ह्या सुद्धा निर्जंतुकीकरण कराव्यात
- शेतीमालाचे ढीग करण्यासाठी दोन ढिगामधील अंतर ३ ते ४ फूट ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी शक्यतो एक किंवा दोन कामगारच वापरावेत.. मका आणि भुईमूग या पिकांच्या मळणीसाठी वापरले जाणाऱ्या यंत्राचे निर्जंतुकीकरण करावे कारण हि यंत्रे शेतकरी वेगवेगळ्या गटांमध्ये वापरत असतात